लॉटरीची झिंगपुन्हा मूळ विषयाकडे येतो, पहिले वर्ष संपले. त्यानंतर मी कॉलेजमधला संपर्क थोडा कमी केला. आपण पैसे कमविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, हि जाणीव त्यावेळी आमच्यातल्या अनेकांकडे होती. मग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी, राजा आरगे, बापू जागडे आणि राजेश माचकर असे चौघे एकत्र आलो. प्रत्येकी एक हजार रुपये असे चार हजार जमा केले. लॉटरी स्टॉल आपण टाकू, असे आमचे ठरले. त्यानुसार वाटचाल सुरू झाली.
मला होस्टेलवरुन सायकलवर कोथरूडला जावे लागायचे. वनाज कॉर्नरच्या बाजूला हा स्टॉल टाकला. त्यासाठी एक टेबल, खुर्ची, तिकीट ठेवण्यासाठीची अन्य सामग्री आम्ही राजा आरगेच्या घरून आणली. त्याचे अण्णा म्हणजे वडील मदतीला यायचे. साधारण तीन हजारांची तिकिटे आम्ही घ्यायचो. यात दोन रुपये किंमतीच्या तिकिटांची संख्या जास्त असायची. एखाद्या माणसाने दहा तिकिटे 20 रुपयांची घेतली आणि त्यांचा शेवटचा नंबर जर शून्य ते नऊ असा असेल तर त्या माणसाला वीस रुपये भरून सोळा रुपये लागायचेच लागायचे. खेळणारे त्यावेळी सोबत तक्ता ठेवायचे. काल आठ नंबर आला आज अमकातमाका येणारच, असे म्हणून चर्चा चालायची. खूपच वेगळे विश्व मी जवळून बघत होतो. नंबर आला तर जग जिंकल्याचा आनंद आणि नाही आला तर सिगारेट, विडीच्या झुरक्यात चहाबरोबर अपयश पचविणारी मंडळी बघायला मिळाली. त्या लॉटरीचे सगळे नियोजन वीस टक्कायत चालायचे. शंभर रुपयांची तिकिटे विकली तर तर त्यातले 80 रुपये हे बक्षीस म्हणून द्यावेच लागायचे. त्यात आमची तिकिटे विकणाऱ्यांचीही अनेकदा गोची व्हायची म्हणजे तिकिटे माघारी न घेण्याच्या बोलीवरील असतील आणि लागणारे नंबर फक्त गेले. बिगर लागणारे राहिले तर ती तिकिटे अंगावर पडायची. त्यावेळी म्हणजे साधारण 93-94 साली या प्रकारच्या लॉटरीचे मोठे बूम आले होते. मी साधारण पंधरा दिवस हा सगळा प्रकार जवळून बघितला. पुढच्या पंधरा दिवसात हे आपल्याला जमेल का याचा विचार केला आणि महिना संपत असताना शांतपणाने मला जमणार नाही. मी बाहेर निघतो, असे म्हणून हजाराला काही शेपाचशे लागून आले तेवढे घेऊन या धंद्याला रामराम केला. माझ्यानंतर साधारण सहा महिने ते आठ महिने राजेश माचकर या सगळ्यांबरोबर राहिला. त्यानेही त्यांच्यातून कल्टी मारली. उरले शेवटी फक्त दोघे. बापू जागडे आणि राजा आरगे. काहीदिवस गिरीश लवळेकरनेही त्यांचे बघून या धंद्यात शिकत असतानाच नशीब अजमविण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही ते काही जमले नाही. त्या दोघांनी तो धंदा वाढविला. राजाने होलसेल तिकीट विक्रीची एजन्सी घेतली. त्यांची पार्टनरशीप पुढे साधारण सहा-सात वर्ष चालली. त्यानंतर आता राजाने पूर्ण व्यवसायात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा पिंडच तसा होता. पोलिसांनी त्रास द्यायला सुरवात केल्यावर त्याने लॉटरी बंद केली. त्यानंतर काही गाड्या घेतल्या. तो व्यावसाय केला. आता तो ट्रीप ऍरेंज करतो. कोथरूडला एक फ्लॅट दोन दुकाने, त्याशिवाय बालेवाडीजवळ चार एकर जमीन घेतल्याचे तो मध्ये काही दिवसांपूर्वी सांगत होता. त्याचे आणि माझे अजूनही चांगले संबंध आहेत. त्याच्या सगळ्या धंद्याचे रोपटे आम्ही एकत्रित लावले होते. हे तोही मान्य करतो.
या धंद्यातून बाजूला झाल्यावर राजा, बापू इतके जवळचे संबंध माझे माचकरशी राहिले नाहीत. आम्ही एसवायला फार जानी दोस्त होतो. मला त्यांच्या व्यवसायात पुढे काय झाले माहित नाही मात्र त्याने सायकॉलॉजी विषय निवडला. आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे गेलो. तसे प्रत्येकाचे कुठे ना कुठे मन गेलेले असायचे. माचकर त्याची प्रेमकरण सांगायचा. बापूलाही कुठली तरी मुलगी आवडायची. राजाने पुढे बीएड् करताना लव्ह मॅरेजच केले. त्याच्या लग्नाला मी गेलो होतो. माझी मात्र गोची व्हायची. स्वतःविषयी काही गोष्टी लपवून ठेवाव्या लागायच्या. त्यामुळे मी कॉलेजच्या पोरांच्या ग्रुपमध्ये मिसळणे कमी केले.
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५
लॉटरीची झिंग
शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५
मी चोरले माझे लग्न
मी चोरले माझे लग्न
खरे तर माझे लग्न म्हटले की माझ्या अंगावर आजही काटा उभा रहातो. माझे आयुष्य उत्तम चालले आहे. तशी कशाची फार अडचण आहे, अशातलाही भाग नाही. नाही म्हटले तरी घरचे मदतीला येतात. नोकरी आहे पण तरीही लग्न इतक्या लवकर झाले त्याने माझा चोळामोळा झाला. एफवाय संपले की माझे लग्न झाले. त्या लग्नाला राजा आरगे आणि राजेश माचकर असे दोघे आले होते. पुढे मी पाच वर्ष शिकलो पण एकूणच स्पर्धेत धावण्यासाठी जी एक मानसिक उर्मी लागते ती कमी झाली होती. पण एकदा लग्न झाले की पोरींशी बोलताना काही वाटत नाही. दडपण येत नाही. गरजेपुरता निरामय संवाद होतो. गरज नसेल तर काही संबंधच रहात नाही. मी माझे लग्न झाले आहे हे कुठेही उघड होऊ दिले नाही. माझे हे मित्रही इतके जिवाभावाचे की त्यांनी ते कधी सांगितले नाही. त्याचे एक प्रमुख कारण असे होते की मी ज्या होस्टेलवर रहात होतो तिथे तुमचे लग्न झाले असेल तर ऍडमिशन नाही, असा एक नियमच होता. तो नियम मी मोडला. नुसताच मोडला नाही त्यानंतर लग्न झाल्यावरही मी कसे शिक्षण घेतले हे मी लिहले. ते मी एमएला असताना सकाळमध्ये तरुणांचे जे पान होते तिथे लेख स्वरुपात छापून आले. जर्नालिझमचा माझा जवळचा मित्र अनिल घोळवेकडे मी हा मजकूर दिला होता. त्यानंतर होस्टेलवर माजी विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम होता. आर. व्ही. कुलकर्णींनी मला बघितले आणि क्षणभर त्यांना कळेना की या पोराला काय म्हणावे. इनामदार त्यावेळी प्राचार्य गरवारे कॉलेजचे होते.आपण इतके व्यवस्थेवर कमांड करणारे पण आपल्याला यानेही काही कळू दिले नाही, याची एक सल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. खरे तर मी या होस्टेलवर रुढार्थाने तयार केलेला नियम मोडून रहाणे यात काही गैर होते, असे मला आजही वाटत नाही. याचे कारण असे की मी काही चुकीचे, अनैतिक, व्यवस्थेला बाधा येणारे वागत होतो, असे कधी झाल्याचे मला आठवत नाही. उलटपक्षी हजारो वर्ष इथल्या सगळ्याच व्यवस्थेवर कमांड असणाऱ्या समाजाला मला जवळून बघता आले. त्यांचे डावपेच जसे समजून घेता आले तसे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकताही आल्या. पुण्यात मुळातच ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे. आमच्या गावात एकही ब्राह्मणाचे घर नव्हते. मुस्लिम समाजाचे एकच घर आहे. त्यामुळे या दोन्ही समाजघटकांविषयमी माझ्या मनात त्या वयात कुतूहल असायचे. त्यामुळेच की काय या घटकांना मी ब्राह्मण समाजाला समजावून घेतले तेव्हा मी टर्न झालो. मला वाटायला लागले की माणूस म्हणून आपण जास्त पुढे गेले पाहिजे, माणसाला माणूस म्हणून ओळखायला हवे. त्याच्या जातीने, धर्माने त्याला मिळणारी ओळख हि समाजात फूट पाडणारी आहे. समाजाच्या स्वस्थाबरोबरच एकूण प्रगतीसाठी सुद्धा ते गरजेचे आहे. या बाबींचा इथे उल्लेख करायचे कारण असे की मला पोरांकडून आणि एकदा तरा एकी पोरीने विचारले "तू देशस्थ का रे?' मला घडीभर समजेना. पोरांना मी सांगायचो, ""माझी जात कोणती हे 1992 पर्यंत मलाही माहीत नव्हते. पण मी शेती करणाऱ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. जगाचे भरणपोषण करणाऱ्या जमातीतला मी आहे. मी माणूस असणे इतके पुरेसे नाही का?'" पण त्यामुळेच की काय पुढे मला तरुण वयात ज्याज्या ठिकाणी बोलायची संधी मिळायची त्या त्या वेळी मी माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे, मुद्द्यावर फारच जोर द्यायचो. पोरीला मात्र मी देशस्थ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे माझी जात कोणती याबाबत इथे गोची व्हायची. त्यात दुसरी बाब अशी की आडनावावरुन पोरांच्या काही लक्षातही येत नव्हते की याची नाळ नेमकी कुठली? पण त्याने फार फरक पडला नाही. असे मला आज प्रामाणिपणे वाटते. माणूस जसा जास्त खोलात जातो. इतिहासाची काही पाने शिकतो, त्यावेळी त्यातल्या गमतीजमती त्याच्या लक्षात येतात. (अपूर्ण)
शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५
फेसाळता उत्साह... राऊत सर
फेसाळता उत्साह... राऊत सर(अपूर्ण)
गरवारे कॉलेजच्या या होस्टेलमध्ये मी तीन वर्ष राहिलो. आयुष्यातल्या या बहारदार कालखंडाचे माझ्या दृष्टीने दोन टप्पे होते. पहिला टप्पा एफवायचा. कॉलेजचा. प्रचंड जोश, दिवसेंदिवस वाढणारा जनसंपर्क, सोबत सतत कॉलेजमध्ये दहा-पंधरा पोरांना ग्रुप. आपण कुणीतरी आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचे आहे म्हणून दाटलेली उर्मी. त्यातून इगल ग्रुप म्हणून विद्यार्थ्यांच्या गटाची केलेली स्थापना. कॉलेजच्या गेटवर, ग्राऊंडवर, स्टेडियमध्ये आम्ही रोजच जमायचो. काहीजण माझ्याकडे होस्टेलवर यायचे. रोज एक लिटर दूध मी घ्यायचो. काहीजण त्या दुधावरही ताव मारायचे. मी एनसीसीत होतो. कॉलेजच्या लायब्ररीतही गाजलेली पुस्तके शोधायचो. ती वाचून काढण्यासाठी रात्ररात्र जागायचो. राजेश माचकर, राजेश आरगे, बापू जागडे, गिरीश लवळेकर, अश्पाक मुजावर, जितेंद्र पायगुडे, विनोद सोंडनवर, गिरीश खळदकर, ठाकरे, अशी एक ना अनेक वर्गातली अनेक पोर रोजच बरोबर असायची. अनेक गंमती जमती त्यातून घडायच्या.
पोरांत मिसळणारे मास्तर म्हणून इतिहासाचे गणेश राऊत आणि इंग्रजीचे गिरीश पुंगलिया प्रसिद्ध होते. राऊत सर एक दिवस फ्रेंच राज्यक्रांती शिकवित होते. तुटीची राणी ही चौदाव्या लुईची बायको होती. ती लोकांना भाकरी नाही तर ब्रेड खा, असे काहीतरी सांगत होती. राऊत सरांनी बोलता बोलता एक उल्लेख चुकविला. मी हे अगोदर वाचलेले होते. तसे राऊतसरही नुकतेच एमए होऊन शिकवायला आलेले. त्यांचे लेक्चर संपल्यावर भर वर्गातच मी त्यांना म्हणालो, "तुटीच्या राणीविषयी जरा जादा माहिती सांगा.' त्यांची दांडी गुल झाल्यासारखी झाली. त्यांनी तिच्याविषयी पाचसहा वाक्य काहीतरी सांगितली, मात्र चुकविलेला उल्लेख त्यांच्या लक्षात आला. नंतर ते आमचे खूप जवळचे मागदर्शक झाले. पण अनेकदा ते एक गोष्ट सांगायचे, "माझे आत्मचरित्र मी जर लिहले तर राजाराम तुझा आणि मी घेतलेल्या पहिल्या तासाचा उल्लेख त्यात नक्की असणार.' राऊसतसरांनी "जर्नलिझम'चा डिप्लोमा केला होता. ते दैनिक प्रभातमध्ये काम करायचे. पत्रकारितेच्या क्षेत्रात मी यायला ज्या प्रमुख घटना कारणीभूत आहेत, त्यात राऊतसर हे सुद्धा आहेत. आता हे फिल्ड नेमके कसे आहे, याबाबत लिहणे हा स्वतंत्र विषय आहे, पण मला ते खूप आवडायचे. त्यांनी बरीच पुस्तके लिहली आहेत. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे पुस्तक वाचल्यावर आपण त्यांना फोन करावा, असे मला वाटले, पण नंबर नव्हता. मग एक दिवस पुण्याला त्यांच्या कॉलेजात गेलो. ते भेटले नाही. मग एक दिवस त्यांना फोन केला. आमच्या खूप गप्पा झाल्या. आमचे कॉलेजचे पहिले वर्ष आणि राऊतसर या अविभाज्य गोष्टी आहेत. आम्ही सगळेच तसे मध्यमवर्गीय किंवा त्यापेक्षाही खालच्या उत्पन्नगटातले. राऊतसरही आम्हाला आमच्या फार जवळचे वाटायचे. त्यामुळेच की काय पुढे मला फार रस नसतानाही आमच्या सगळ्या ग्रुपबरोबर मी इतिहास हा स्पेशल विषय निवडला. आता राऊतसर सकाळच्या बुधवारपेठेतील कार्यालयालाच लागून असलेल्या देसाई कॉलेजमध्ये आहेत. पुढे आमच्या वर्गातल्या हुशार म्हणून गणल्या गेलेल्या ज्योती भोसलेशी त्यांचे लग्न झाले. ते आम्हाला सरांपेक्षा मित्र जास्त वाटायचे. ते काय मित्रांनो, असा उल्लेखही करायचे. त्यांची चिकाटी, नव्या गोष्टी समजून घेण्याची तयारी मला आता खूप महत्वाची मागदर्शक वाटते.
दुसरे राहुल पुंगलिया सर. अत्यंत हुशार अशी इमेज. इंग्रजी शिकवायचे. टकाटक रहायचे. पोरांबरोबर काहीदा चहाला यायचे. त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांना त्यावेळी एक छोटी मुलगी होती. काहीदा ती त्यांच्याबरोबर यायची. ते शिकवायचेही फार मस्त. परवा पाचगणीजवळ खिंगरला अक्षर मानव समाज संमेलनात पुण्याच्या प्रशांत कांबळे या तरुणाची भेट झाली. माझ्यासारखाच तो त्यांचा विद्यार्थी. मी कंपल्सशीचा तर तो स्पेशल विषयाचा. तो सांगत होता की मास्तर असावा तर पुंगलिया सरांसारखा. असे म्हणत तो त्यांच्या कौतुकाच्या अनेक गोष्टी सांगत होता.
.....
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५
रिटायरमेंट आणि गेट टुगेदर
आर. व्ही कुलकर्णींवरील हा लेख चार फेब्रुवारी 2011 या तारखेला सोलापूर सकाळमध्ये पान 11 वर तर त्यानंतर तीन दिवसांनी सात तारखेला पुणे सकाळमध्ये टुडे पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. ज्या दिवशी सोलापुरात प्रसिद्ध झाला खरे तर त्याच दिवशी तो तिकडेही प्रसिद्ध व्हायला हवा होता. पण वर्तमानपत्राच्या मोठ्या गंमती असतात. त्याच्याविषयी काही लिहायचे म्हटले तर तो एक स्वतंत्र खूप "इंटरेस्टिंग' विषय आहे. अचानकच काहीतरी उद्भवते आणि ठरविलेली गोष्ट काढून अन्य विषय पुढे न्यावे लागतात. सहसंपादक चंद्रशेखर पटवर्धन यांच्याकडे मी हा लेख दिला होता. ज्यादिवशी तो येणे अपेक्षित होते त्याच्या आदल्यादिवशी मी त्यांना फोन केला. मी म्हणालो, "लेख लागला नाही.'
ते म्हणाले, "मी लावूनच आलोय. काहीतरी गडबड झालेली दिसतेय. ठीक आहे मी उद्या गोल्यावर बघतो.'
त्यानंतर त्यांना मी म्हणालो, "माझा आमका तमका मजकूर छापा असा आग्रह मी कधीच धरत नाही. हा लेख नाही छापला तरी माझे काही मत नाही, मात्र येणार नाही, असे सांगितले असते तर बरे झाले असते. आपण वर्तमानपत्रात जे देतो, त्या चौकटीत हा लेख बसणारा आहे, असे माझे मत आहे.'
"होय राजाराम, तु काय मला लांबचा आहेस का? माझासुद्धा त्या कॉलेजशी संबंध आहे. आर. व्ही कुलकर्णी मला माहित आहेत. तुला मी खोट बोलतोय, असे वाटतंय का? खरेच काहीतरी अडचण आली असेल,' असे त्यांनी माझे सांत्वन केले. त्यानंतर मी त्यांच्याकडे या लेखाचा फॉलोअप घेतला नाही, मात्र तो दोन दिवसांनी प्रसिद्ध झाला.
हा लेख आल्यानंतर त्यादिवशी सकाळी सकाळी पहिली प्रतिक्रीया आली ती करमाळा तालुक्यातील जेऊरहून. डॉ. महावीर अब्बड यांनी एसएमएस केला होता. त्यांनी अभिनंदन करीत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. माझ्या संपर्कात असतानाही ते या होस्टेलचे विद्यार्थी असल्याचे मी विसरलो होतो. जेऊरला चांगले मोठे हॉस्पीटल त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर बांधले आहे. माझ्या मागच्या बॅचमध्ये ते होते. प्रकृती किडकीडीत, कॉलेजमध्ये असतानाच डोळ्याला चष्मा लागलेला. करमाळा तालुक्यातीलच सावडी त्यांचे गाव. मला माहित असते तर या कार्यक्रमाला मी आलो असतो, असे ते म्हणाले. त्यानंतर दादा मराठेचाही फोन आला. कुर्डुवाडीत पंचायत समितीत तो काम करीत आहे. गाव त्याचे माढा तालुक्यातील निमगाव. घरच्यांचा एकुलता एक. फौजदारच व्हायचे म्हणून त्याने एनसीसीसह अनेक गोष्टी केल्या. आरडी परेडसाठी कष्ट घेऊन दिल्लीला राजपथावर संचलन करुन आला. पण प्रश्नपत्रिका फुटणे आणि अन्य झपाट्यात त्याला फौजदारची परीक्षा पास होणे काही जमले नाही. जिल्हा परिषदेकडे तो लागला. त्यादिवशी आपण जाऊ म्हणून त्याने फोन केला. मी कुर्डुवाडीत उतरलो. त्याच्या घरच्यांना भेटलो. त्याच्या आईचे दर्शन घेतले. रेल्वे चुकेल म्हणून पटकन स्टेशनवर येऊन जेवण केले. तिथून आम्ही पुण्याला मिळून गेलो. तिथे अनेकजण भेटले. त्यात दत्ता कदम, निखील गाडगीळ, अभिजित पिंपळे, मोनिका गांधी, होस्टेलचे मामा अशा अनेकांचा समावेश होता. हे होस्टेल मी एकदा पाहून घेतले आणि माझ्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात मी एका अर्थाने परिचित होत होतो. त्याचे कारण त्या ठिकाणी होस्टेलविषयी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला आणि "सकाळ'ने आर. व्ही विषयी लिहलेल्या लेखांची कात्रणे झेरॉक्स करुन सगळ्यांना दिली जात होती. त्यातला लेख तिथे आलाय म्हटल्यावर तरुण पोरांना वेगळे कौतुक वाटायचे. पण त्यातही एकदोघजण म्हणाले, "आर. व्ही. किती खडूस आणि त्यांच्यावर इतके काय लिहले रे?' त्याच्या चेष्टेच्या स्वराकडे मी फार लक्ष दिले नाही. तो दिवस मस्त गेला. यानिमित्ताने आर. व्हीशीं गप्पा झाल्या. कॉलेजचे प्राचार्य आणि आणखी काही मंडळी भेटली.
(अपूर्ण)
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५
मैत्र जीवाचे.... : छळ पुरुषांचाही.....
मैत्र जीवाचे.... : छळ पुरुषांचाही.....: छळ पुरुषांचाही..... जागतिक महिलादिन धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषा...
छळ पुरुषांचाही.....
छळ पुरुषांचाही.....
जागतिक महिलादिन धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची या निमित्ताने चर्चा होते. पण आता पुरुषांचाही छळ होतो. त्याविषयी आपण काहीच बोलणार नाही का? आज साजरा होत असलेल्या पुरूषदिनानिमित्त एका संस्थेच्या माध्यमातून या प्रश्नाचा घेतलेला वेध...
------------------------------------------
महिलांचा छळ हा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेतला सनातन प्रश्न आहे. महिलांनी आणि समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठविला. देशात 19 व्या शतकात ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या महिलांची स्थिती बदलली पाहिजे, या निष्कर्षाप्रत येऊन ठेपतात. "युनो'ने 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष म्हणून साजरे केले. याबाबत प्रत्येक टप्प्यावर मंथन घडले आहे. काळानुरूप महिलांचे प्रश्न बदलत गेले. पण आता समाजाच्या पोटात पुरुषांच्या छळाची खदखदही सुरू आहे. हा कल्पनाविलास नाही. एका संस्थेची कागदपत्रे चाळल्यानंतर दिसलेली ही स्थिती आहे. "माझा काहीच दोष नाही. हे माझ्यासमोर नेमके काय वाढून ठेवले आहे. माझी यातून सुटका कशी होईल,' अशी आर्त हाक अनेक जण देत आहेत.
- - - - - - - -
"कौटुंबिक सल्ला - सेवा व मार्गदर्शन केंद्र' ही ती संस्था होय. तिच्या महाराष्ट्रात 66 तर देशात सहाशेपेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. दिल्लीच्या समाजकल्याण मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कल्याण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही केंद्र राज्यात चालविली जातात. सोलापुरात गेल्या 15 वर्षांपासून अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी हे केंद्र चालवीत आहे. जनजागृती आणि अन्य माध्यमातून लोकांना कौटुंबिक आधार देणाऱ्या केंद्राबाबत माहिती दिली जाते. पहिल्यांदा केंद्रात येणाऱ्या महिलेचे किंवा पुरुषाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. बोलते करून त्यांना घुसमटीतून मोकळे केले जाते. त्यानंतर माहिती लिहून घेतली जाते. संबंधितांना बोलविले जाते. त्यांना समजावून या प्रश्नावर तोडग्याचे विविध पर्याय चोखळले जातात. प्रश्न सुटल्यानंतर पुढे सहा महिने फॉलोअप ठेवला जातो. प्रश्न मार्गी लागला तर फाईल बंद होते. काहींच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयाकडे वर्ग केली जाते. एखाद्याबाबत पुन्हा जुनाच प्रश्न उद्भवला, तर ती "रिओपन' होते....
----------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्राकडे गेल्या वर्षभरात 154 तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक 41 अर्ज सासरी होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाबाबत आहेत. त्यानंतर 35 अर्ज पुरुषांचे आहेत. मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळाल्यानंतर तो मागणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढले आहे. त्या प्रकारचे 17 अर्ज आहेत. वृद्धापकालीन समस्यांबाबत 14 अर्ज आले आहेत. याशिवाय लैंगिक छळ, विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, लग्नाआधीचे समुपदेशन अशा विविध प्रकारचे अर्ज आले आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य टिकावे म्हणून झटणाऱ्या या संस्थेचा उद्देश महिलांना मानसिकदृष्ट्या मुक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी करणे हा आहे. पण अनेकदा आपल्या नवऱ्याविरुद्ध अथवा सासू-सासऱ्याविरुद्ध अर्ज करणारी महिलाच सगळ्यांना हैराण करीत असल्याचे उघड होते. हे प्रमाणही मोठे आहे. "झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीप्रमाणे अनेक जण इभ्रतीला घाबरून काही बोलत नाहीत, असे कागदपत्र सांगतात.
- - - - - - - -
ती नोकरी करणारी मुंबईतील. बी.कॉम झालेली. तो बी.एस्सी. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील. दोघांचे लग्न झाले. तिला खेडेगावात करमेना. लग्नानंतरही तिने तिच्या मुंबईतील मित्राशी नवऱ्याला न कळता संपर्क ठेवलेला. तो तिला "नवऱ्याला घटस्फोट दे' म्हणून फूस लावायचा. ती दोनदा पळून गेली. तिच्या सांगण्यावरून नवरा तिला घेऊन शहरात राहायचे म्हणून सोलापुरात आला. ती एक दिवस केंद्रात आली. नवरा छळ करतो. मला घटस्फोट हवा, अशी तक्रार तिने केली. तिला एक मुलगी होती. तिच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. त्यांनी सांगितले, की मुलाविषयी आमची काही तक्रार नाही. तिने त्याच्यावर पोलिस केस केली. तो व्यवसाय करायचा ती कागदपत्रे जाळली. अखेर तिला तिच्या आईवडिलांकडे सोडण्यात आले. ती गेली. त्याने तिच्यासाठी कितीतरी सोसले. पण तरीही आता तो आणि त्याचे अकरा महिन्यांचे बाळ दिशाहीन झाले आहे.... अशी अनेक प्रकरणे सांगता येतील. महिलांच्या हट्टीपणाची, दुराग्रहाची आणि अहंकाराची...
---------------------------------------------------------------------
सोलापुरातील केंद्रात अगदी सुरवातीपासून सुमित्रा आगरखेडकर समुपदेशक म्हणून काम करतात. समाजजीवनातील बदलत्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, ""आतापर्यंत आम्ही अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. महिन्याला साधारण पंधरा-वीस जण आमच्याकडे मदतीसाठी येतात. पण मदतीच्या मागणीसाठी येणारी महिला अथवा मुलगीच दोषी आहे, असे ज्या वेळी आढळून येते त्या वेळी वाईट वाटते. अलीकडच्या काळात असे खूपदा आढळून येते. शिकलेल्या मुलींची महत्त्वाकांक्षा मोठी असते. मात्र त्यासाठी आपण आपल्याच माणसाला त्रास देतोय, हे अनेकदा त्यांच्या लक्षातही येत नाही. फार टोकाचे निर्णय घ्यायला त्या तयार होतात. त्यामुळे सध्या अनेक प्रकरणांमध्ये प्रश्नांची गुंतागुंत वाढत गेल्याचे जाणवते.
""सध्याचे कायदे समाजोपयोगी आहेत. मात्र त्याचा अनेकदा गैरवापर केल्याचे दिसून येते. असेच घडत राहिले, तर पुरुष अत्याचार निवारण केंद्राचीही उभारणी करावी लागेल. संस्कृतीची महती आपण नेहमी सांगत असतो पण बदलत्या जमान्यात आपण नेमके कुठे आहोत, याचाही विचार करावा लागणार आहे. कायद्याची माहिती न घेताच अनेकजणी भावाच्या संपत्तीत हक्क हवा म्हणून आमच्याकडे येतात. त्यातून कोर्टाचे खेटे सुरू होतात. पण आतापर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला आहे.''
पत्ता- कौटुंबिक सल्ला- सेवा व मार्गदर्शन केंद्र. 701, थोबडेवाडा. उत्तर कसबा. मल्लिकार्जुन मंदिराशेजारी. सोलापूर.
दूरध्वनी- 0217 2726311.
(हा माझा लेख 27 मार्च 2006 ला सकाळच्या मधुरा पुरवणीत प्रसिद्ध झाला होता ः राजाराम ल. कानतोडे)

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
विद्यार्थी घडविणारे होस्टेलपीठ
सात फेब्रुवारी 2011
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर
सुवर्णमहोत्सवानिमित्त पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या होस्टेलमधील माजी
विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवारी पाच फेब्रुवारीला होत आहे. होस्टेलचे प्रदीर्घ काळ
रेक्टर राहिलेले प्रा. आर. व्ही. कुलकर्णी हेही आपल्या जबाबदारीतून मुक्त होत
आहेत. त्यानिमित्त या होस्टेल आणि त्यांच्या वेगळेपणाविषयी....
राजाराम ल. कानतोडे
-----------------------------
प्रेमाने जवळ न घेता अथवा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांत कटू भावना निर्माण होईल, असे न वागता अनेक शिक्षक आपल्या वागण्यातून विद्यार्थ्यांत स्फूर्ती जागवत असतात. न सांगताही मग विद्यार्थी त्यांच्यामागे चालू लागतात आणि आयुष्याला आकार येतो. असे हजारो विद्यार्थी घडविणारे गरवारे महाविद्यालयाचे निवृत्त प्रभारी प्राचार्य आर. व्ही. कुलकर्णी हे एक चालतेबोलते होस्टेलपीठ आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन तपांपेक्षा जास्त काळ आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे होस्टेल आणि आर. व्ही. सर हे एक अतूट नाते आहे. त्यातले केवळ तीन वर्षे मी या वसतिगृहात राहिलो. मी माझ्या आयुष्याकडे बघतो त्या वेळी केत्तूर (ता. करमाळा) सारख्या आडगावातून आलेल्या माझ्यासारख्याला या होस्टेलने जे दिले ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. असे बरेच आहेत ज्यांना आर. व्ही. सरांनी घडवले. वॉर्डन मोहन यादव रशियात, प्रशांत तानवडे, महेश देशपांडे अमेरिकेत आहेत. निखिल गाडगीळच्या लंडनला सारख्या वाऱ्या सुरू असतात. विद्येश गोवंडे संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. अभिजित पिंपळे सी.ए. झाला. लोकेश गुजराप्पा, शैलेश दाभोळे, संजय जोशी, सुपर्णा अष्टेकर, हरीश सारडा हेही आपापल्या फील्डमध्ये आघाडीवर आहेत. जॉन व्हिक्टर, चकोर बाविस्कर, हरीश मेहता, दत्ता कदम, जितेंद्र राक्षे, सूरज शहा, दीपक लोहार, रवींद्र भारदे अशी मागेपुढे असणाऱ्यांची ही यादी लांबवायची म्हटले तर खूप मोठी होईल. आयुष्याच्या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात होस्टेलचे कुटुंबप्रमुख म्हणून आर. व्ही. सरांनी भरलेली ऊर्जा त्याला कारणीभूत आहे. ती आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ते ठरवून काही करत नव्हते. होस्टेलच्या व्यवस्थेचा भाग म्हणून सगळ्यांना ते वाटत गेले. नवे उपक्रम राबवीत गेले. त्याने हजारो जण आपोआप घडत गेले.
विद्यार्थ्यांच्या लेखनाला स्थान देणारा पालवीसारखा वार्षिकांक काढणारे गरवारे कॉलेजचे होस्टेल हे एकमेव असावे. विद्यार्थी असताना दीपा बेंदूर, शैलेश दाभोळ, प्रांजली दाऊदखाने यांना 1994 मध्ये सुभाष घई यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाची व्यासपीठावर थेट मुलाखत घेता येते. या गोष्टी स्वप्नवत वाटत असल्या तरी त्या सत्यात आर. व्ही. सर उतरवीत होते. संधी मिळतेय म्हटल्यावर भावनेच्या भरात अनेक जण वक्तृत्व स्पर्धेत, काव्यवाचनात, व्यासपीठावर काहीबाही बोलल्यावरही ज्या-त्या गोष्टी जिथे-तिथे विद्यार्थ्यांना सांगून अनेकांना त्यांनी लाइनवर आणले. मुला-मुलींचे होस्टेल एकमेकांना लागून आहे, पण त्या सगळ्या वातावरणात आर. व्हीं.चा धाक भरून राहिलेला असायचा. मुला-मुलींचे परस्परसंबंध कसे निकोप ठेवता येऊ शकतात, याचे हे होस्टेल एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मुलांनी सगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व फुलवत असताना त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही, यावरही त्यांचे लक्ष असायचे. कुणाचा कुठे उपयोग करून घ्यायचा याबाबतही त्यांचा दांडगा हातखंडा आहे.
केवळ होस्टेलचे रेक्टर म्हणून नव्हे, तर इतर अनेक संस्थांतही आर. व्ही. कुलकर्णी सर कार्यरत होते, आहेत. एन. सी. सी., रेड क्रॉस, विज्ञान भारती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा विविध ठिकाणी ते काम करीत असल्यामुळे अनेक संधींची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे मिळायची. एनसीसीमध्ये आर. डी. परेड (प्रजासत्ताक दिन संचलन) साठी पूर्वी सहा किलोमीटर धावावे लागत होते. दादा मराठे, मोहन यादव याच्यासह अनेकांची त्यांनी तयारी करून घेतल्याने ते राजपथावर संचलन करू शकले. रेड क्रॉसला मदत मिळावी म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत लावलेल्या स्टॉलमध्ये सामाजिक कामातही धमाल अनुभवता यायची. ते कुठलेही काम स्वतः करतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत सांगतात. स्वतः त्यांनी 48 वेळा रक्तदान केले आहे. सतत तीन वर्षे सर्वाधिक रक्तसंकलन केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला. सेवाभावी कार्याबद्दल राज्यपालांकडून गौरव करण्यात आला. त्यांना अनेक सन्मान मिळाले. आपल्या मोठेपणाबाबत ते नेहमी मौन बाळगतात. आपल्या मोठेपणापेक्षा आपले काम महत्त्वाचे, ही त्यांची धारणा घडोघडी दिसते. त्यांच्यासारख्या शिक्षकांची आज गरज आहे. सगळा समाज मौज-मस्तीच्या मागे धावत आहे. नैतिकतेचा अभाव ही समाजाची जणू ओळख होऊ पाहत आहे. अशा कालखंडात आर. व्ही. सरांसारखे जीवनशिक्षण देणारे शिक्षक गरजेचे आहेत.
विद्यार्थी घडविणारे
होस्टेलपीठ
|

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५
ऋणानुबंधाच्या गाठी
एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात
अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे
निघावे, तशी ही कॉलेजची वर्ष असता. या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात.
----------
मैतर जिवाचे लेखाविषयी अनेक प्रतिक्रिया आल्याच. त्या कुणी दिल्या, काय दिल्या, ही मोठी जंत्री होईल. त्यातल्या दोन सांगतो. एक म्हणजे त्याच वेळी एका रविवारी संजय आवटे याने फोन करुन मैत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आवटे माझा मित्र आहे. तरीही आमच्यात एक अंतर आहे. पाचवी ते दहावी आम्ही एका वर्गात होतो. पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. पुणे विद्यापीठात पुन्हा आम्ही होस्टेवर एकाच वेळी एक वर्षभर होतो. विद्यापीठात आम्ही तशा अनेक रात्री गप्पा मारत जागवत काढल्या. आम्ही गप्पा मारायचो, रात्रीचे दोन, तीन, चार, पाच वाजायचे. रुम पार्टनरच्या झोपेचे खोबरे झालेले असायचे. तो वैतागयचा. आमच्या गप्पांचा विषय कायम राजकारण, समाजकारण हाच असायचा. आपल्याला काय करता येईल, याचे आराखडे आम्ही बांधत रहायचो. पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. पण त्याने पत्राकारितेत जी धडक मारली ती कुणीही कौतुक करावं अशीच आहे. मी पत्रकारितेचा कोर्स त्याच्याआधी एक वर्ष केला मात्र तो "सकाळ'मध्ये माझ्याआधी साधारण सहा महिने लागला. कायम होण्याच्यादिवशीच त्याने सकाळ सोडला. सोलापूरला संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाला. त्यावेळी त्याचे वय जेमतेम 23-24 असेल. इतक्या कमी वयात त्याने सोलापूरलासुद्धा ज्या पद्धतीने काम केले, एक त्याचा चाहता वर्ग इथे तयार झाला आहे. खरे तर पत्रकारितेत वरच्या पदावर काम करणे म्हणजे तसे अवघड असते कारण इथे सगळेच हुशार असतात. तुम्हाला तुम्ही कायम त्यांच्या चार पावले पुढे आहे, हे दाखवता आले नाही तर गडबड होते. सोलापूर, अकोला, पुणे, अलिबाग आता मुंबई, असे प्रत्येक ठिकाणी त्याने संपादक, वृत्तसंपादक अशा प्रमुख पदांवरच काम केले. सगळीकडे मालकांनी, व्यवस्थापनाने संपादकांना, संपादकीय विभागातील वरिष्ठांना काढून टाकण्याच्या दिवसांच्या कालखंडात त्यांना घुमवणारा, तुमच्याशी जमत नाही, मीच आता सोडतो, असे म्हणणारा एखाद्या तरुण पोरगा असावा, याला तोडच नव्हती. काही पुस्तकेही त्याच्या नावार आहेत. पण त्याची एक गोष्ट मला कायम भुरळ घालत आली आहे त्याला जे म्हणायचे आहे त्याच्याशी तो कधीच तडजोड करीत नाहीत. तो हुशार आहे का तर मी म्हणेन हुशार अनेकजण असतात, पण स्वतःला प्रेझेंट करण्याचे, स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचे आणि हे सगळे कटुता न येऊ देता समोरच्याला न दुखवता करण्याचे त्याचे स्कील वादातीत आहे.
दुसरी प्रतिक्रिया अगदी अलीकडे मिळाली. ती ऐकल्यामुळेच आपण हा लेखामागचा लेख लिहिला पाहिजे, असे मला वाटले. केंद्र सरकारकडे प्रादेशिक माहिती अधिकारी अंकुश चव्हाणबरोबर मी सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त पी. आर. पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्यांची आणि अंकुशची कोल्हापूरची ओळख होती. अंकुशने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते घडीभर थांबले. मी तुम्हाला ओळखतो. मला कळेना आमची ओळख कुठे झाली. मी कोल्हापुरात होतो. पण माझी त्यांच्याशी कधी थेट ओळख झाल्याचे मला आठवत नव्हते. ते म्हणाले, "तुमचा युवा सकाळचा लेख माझ्या अजून लक्षात आहे. तुम्ही त्या तीन मित्रांची नावे का लिहिली नव्हती हो.' मला घडीभर काय बोलावे हे कळेना. मी काहीतरी म्हणून वेळ मारुन नेली आणि पुढे आपण या तिघांबरोबर कोल्हापुरात संपर्कात आलेल्या काही मित्रांविषयी लिहायचे, असा मी ठरविले.
तसे हे राजाराम कॉलेजचे दिवस फार भारी होते. किती गोष्टी सांगाव्यात याला पारावार राहणार नाही. माझे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर. मी इतक्या लांब आणि तेही आर्ट शिकायला कसे गेलो, असे अजूनही मला अनेकजण विचारतात. तसे कारण काहीच नव्हते पण चांगले मार्क पडले होते, पैलवानांचे गाव म्हणून कोल्हापूरचे आकर्षण होतेच. तसे हे गाव दिलदार आहेच. त्यात राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, ऍग्रिकल्चर कॉलेज, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि शाहू इन्टिट्युट म्हणजे सायबर हा सगळा हजार-दीड हजार एकराचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलेला असतो. या परिसरात रहायला मिळणे हा तसा एक मोठा संधीचा भाग असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर या भागात इतके मस्त वातावरण असते की ते सांगायला कवीची प्रतिभा पाहिजे. कोणत्याही आई वडिलांना आपला मुलगा चांगला शिकावा, असे वाटतेच. पण त्यापलीकडे माझ्या दोन नंबरच्या भावाला म्हणजे कारभाऱ्याला गावात शंकाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि घरात सगळेजण बापू म्हणतात त्याला मी पैलवानकीत नाव कमवावे, असे वाटायचे. त्याचे काय झाले पुढे सांगेन. पण माझा दुसरा भाऊ तुकाराम बुवालाही माझ्या शिक्षणाचे कौतुक होते. तोच पहिल्यांदा माझ्याबरोबर ऍडमिशन घ्यायला आला. सोडवायला कारभारी आला. पुढचा शिक्षणाचा सगळा प्रवास माझा मी एकट्याने केला.
जाता जाता दोघांची नोंद करायला पाहिजे. तिथे कुणी गावाकडचे किंवा गावाजवळचे भेटले की चांगले वाटायचे. एकदा भाऊ कानतोडे माझ्याकडे आला होता. आम्ही दोघ त्यावेळीही कोल्हापूर खूप फिरलो. भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर एकदा पोमलवाडीचा हनुमंत पाटीलही भेटला होता. तो राजाराम कॉलेजचाच विद्यार्थी होता. राजकुमार लोटके त्याचा जवळचा मित्र होता. त्याच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या होत्या. भाऊ आणि हनुमंत हे दोघेही तसे खूप चांगले होते, पण काळाने दोघांवरही अकाली झडप घातली. दोघांचेही वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाले. जेव्हा जेव्हा या दोघांचा कुठे बोलताना विषय येतो त्यावेळी मला मी अनुभवलेला त्यांच्यातला उमेदपणा दिलदारपणा विसरता येत नाही. पण सगळ्या गोष्टींवर काळ हेच औषध असते. एखाद्या एसटीने आपण एक गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करावा. त्यात अनेकांशी मैत्री व्हावी. आपापला थांबा आली की प्रत्येकाने आपापल्या मार्गाने पुढे निघावे, तशी ही कॉलेजची दोन वर्ष होती. सांगण्यासारखे आणखी खूप आहे पण या लेखाच्या निमित्ताने एवढेच पुरेसे आहे... या ऋणानुबंधाच्या गाठी मनात कायमच रुंजी घालतात. तसा प्रत्येकाचा हा वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षाचा काळ जडणघडणीचा असतो. तुम्हाला तुमचे दिवस आठवले. मैत्रभाव जागा झाला तर या लेखाचे सार्थक झाले असे मी म्हणेन.....
----------------------

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)