असे का वागतो आपण?
सकाळमध्ये सर्व आवृत्त्यांत युवा सकाळ या आठ पानी टॅबलाईड आकाराच्या पुरवणीत पहिल्या पानावर जिवाचे मैतर हा मुख्य लेख होता. त्यावेळी सुहास यादव आणि संतोष देशपांडे दोघे युवा "सकाळ'चे काम पहात होते. पुणे "सकाळ'चे संपादक यमाजी मालकर होते. या लेखाच्या मजकुराचे संपादन आणि विशेषतः जिवाचे मैतर हे "हेडिंग' मला आवडले होते. उपसंपादकाचे काम हे तसे "थॅंकलेस' काम असते, असे म्हणतात, पण ते किती महत्वाचे असते हे मी अनेक वर्ष बघत आलो आहे. हा लेख माझा अत्यंत छोटेखानी आहे. पण मी पुन्हा पुन्हा आठवणींसाठी वाचतो, त्या प्रत्येक वेली मला सुहास आणि संतोषची आठवण होते. त्याला टाकलेला फोटो बघूनही मी इतका हरखून गेलो होतो. यात लेखकाचे त्याच्या कल्पनेला क्रेडिट आहेच पण त्यापेक्षा माझ्या मनात या उपसंपादक जमातीप्रती असलेली कृतज्ञता वेगळीच आहे. सुहासही मला सिनिअर त्याने सकाळमधून व्हीआरएस घेतली. त्यानंतर लोकमत आणि पुढे पुण्यात प्रभात दैनिकाचा तो संपादक झाला.
लेखात उल्लेखिलेले तिघे माझे सिनिअर मला आवडणारे, तसे यांचेही काही दुर्गुण असतील, माणूस म्हटल्यावर ते शक्य आहे पण त्यांचे दुर्गुण माझ्या कधी नजरेला पडले नाहीत. मला ते माहित नाहीत. राजाराम कॉलेजातच काही दुर्गुणी मुले मी बघितली. दोन उदाहरणे सांगतो.
एका माझ्याबरोबरच्याच मुलाचे. अकरावीतच मी आर्टला, तो सायन्सला होता. तोही होस्टेललाच रहात होता. पहिले सत्र संपले होते. दिवाळीची सुटी लागली होती. सगळ्यांनाच घराकडे जाण्याचे वेध लागले होते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असायच्या. त्यावेळी पैसे हा मोठा फॅक्टर होता. जवळजवळ होस्टेल खाली झाले होते. आम्ही पाचसहा जण शेवटी उरलो होतो. मी दुसऱ्या मजल्यावर रहायला होतो. माझे वर्गमित्र विजय मोहिते, शरद मुळीक आणि पुढच्या वर्गातला भाऊसाहेब चव्हाण ही फलटण तालुक्यातील पवारवाडीची गॅंग खालच्या फ्लोअरवर रहात होती. जेवण झाली. मी खाली येऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसलो होतो. साधारण साडेदहा पावणे अकराचा सुमार असेल, विजय मोहिते मेसवरुन जेवण करुन आला. तोही गप्पांत सामील झाला.
थोड्या वेळाने तो म्हणाला, "अरे तू इथे आहेस, तुझ्या रुममध्ये कोण आहे? लाईट चालू आहे.'
मी म्हणालो, "मी लाईट बंद करुन आलोय.'
"जा बघ जा,' त्याने मला फर्मान सोडले.
मी गेलो. खरेच लाईट चालू होती. बाहेरुन दरवाजा वाजविला. दरवाजाच उघडला जाईना. पुन्हापुन्हा दरवाजा वाजविला. तीन-चार मिनीटे मी तसाच उभा होतो. त्याने दरवाजा उघडला. आत तो एकटाच होता. तो आमच्या रुममध्ये रहात नव्हता.
मी त्याला विचारले, "काय करतो?'
तो म्हणाला, "मराठीचे पुस्तक वाचण्यासाठी घेतोय.'
मी म्हणालो, "इतका वेळ?'
तो काहीबाही बोलत राहिला. घाबरलेला होता. मला समजेना नक्की हा इथे काय करत असावा. मी त्याच्याबरोबर त्याच्या रुममध्ये गेलो. तो माझ्याबरोबरच. पुन्हा मी माझ्या रुममध्ये आलो. तो माझ्याबरोबरच होता. मी माझी बॅग खोलली. त्याला घाम सुटला. माझ्याकडे शेवटचे 80-90 रुपये राहिलेले होते. ते मी तिच्यात ठेवलेले होते. गावाकडून एक दोन दिवसात तीनशे रुपये मनीऑर्डर येणार होती. त्यातून मेसचे आणि अन्य देणी भागवून गावाकडे पळायचे होते. खरे तर आम्ही शेवटपर्यंत थांबलो त्याला कारण आमच्याकडे पैसे नसणे हेच होते. मी बॅग खोलली आणि काय गंमत. त्यातले साठ रुपये गायब झाले होते. मी त्याला तसे सांगितले. तुझ्याशिवाय हे कुणाचे कामच नाही, असे मी म्हणालो. त्याने ते साठ रुपये काढून दिले. दहाच्या सहा नोटा होत्या त्या. तो चांगल्या घरातला होता. वडील, मोठा भाऊ नोकरीला होते. तो माझ्या पाया पडला. ही गोष्ट कुणालाच सांगू नको, असे तो पुन्हा पुन्हा गयावया करून सांगत होता. माझी एमओ येणार आहे. हवे तर मी तुला अजून पैसे देतो, असे तो म्हणाला. मी त्याला तसे कुणालाही न सांगण्याचे वचन दिले. पण तिथे एक संधीसाधूपणा मी केला. त्याने मला पैसे देण्याचे कबूल केले. तसे मी त्याच्याकडून काही तरी उसने पैसे घेतले. मला माझ्या या संधिसाधूपणाच आजही लाज वाटते. आपण साले किती हरामीवरचे हरामी आहोत, असे वाटते. अशा प्रकारे अडचणीत आलेल्या माणसाच्या हतबदलतेचा फायदा घेणे बरोबर नाही. ज्यावेळी अशी अडचणीत आलेली माणसं मी गयावया करताना बघतो, त्यावेळी मला हा प्रसंग अनेकदा आठवतो.
माझ्या मनात एक प्रश्न असा उरतो की इतक्या चांगल्या घरातला मुलगा असे काही का करत असेल? खरेच त्याला पैशाची कमतरता आहे, असे मला कधीही जाणवले नाही. टकाटक तो रहायचा. कपडे, सगळ्या वस्तू यात त्याचे एक स्टॅडर्डड असायचे. त्यामुळे मला आजही या घटनेची मोठी गंमत वाटते. तसा तो मित्रच. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात त्याचे गाव होते. मी अजूनही ही घटना कुणाला सांगितली नाही पण असे का असा प्रश्न माझ्या मनात उरतोच.
दुसरी घटना दुसऱ्या एका वरच्या वर्गातल्या पोराची. त्याला अगोदर होस्टेलवरुन हाकलले होते पण पुन्हा तो आला होता. मी सगळीकडे कॉलेजमध्ये होस्टेलला राहिलो, मला कधी रॅगिंगला सामोरे जावे लागले नाही पण सिनीअरशी आपपल्या ओळखी असाव्यात, असा एक माझा प्रयत्न असायचा. त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर एकाशी जवळीक झाली. तो फार गोड बोलायला लागला. त्याने माझ्याकडून पिश्चर बघितला. मटण खाल्ले. तुला जाण्यासाठी उसने पैसे देतो, असे म्हणाला. माझे सगळे पैसे संपले. काहीच बोलायला तयार नाही बाबा. मला मोठा पेचच पडला. आता काय करायचे. मी तेवढ्यापुरती त्याच्याशी जवळीक तोडली. इतरांकडून पैसे जमवून गावाकडे निघालो. बाहेर रस्त्यावर मी आलो. पट्ट्याने माझा चमचा तुझ्याकडे आहे, मला बघायचा म्हणून माझी बॅगच खोलली. तसा तो मोठा असल्यामुळे मी काही करु शकलो नाही. मी कशाला त्याचा चमचा आणू. बॅग खोलून तो काहीच सिद्ध करु शकला नाही. त्याला कशाचा राग आला होता माहित नाही. पण मला तो इतका इन्सल्ट वाटला. तसा तो चांगल्या घरातला होता. पुढे मी त्या पोराचे करिअर बघितले. पुणे विद्यापीठात काही दिवस तो होता. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता. पण तो काहीच करु शकला नाही. कुठलीतरी एजन्सी घेतली. गावोगाव फिरत रहायचा. आता कुठे आहे? माहित नाही मात्र सांगायचा मुद्दा इतकाच की तुमचे मन जर चांगले नसेल तर तुम्ही काही करु शकत नाही.
मला प्रश्न पडतो आपण असे का वागलो आणि ज्यांना आपण मित्र म्हटले तेही असे का वागले असावेत? न सुटणारे गुंते आयुष्यभर तसेच वागववत फिरावे लागते...........
....(अपूर्ण)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा