जो उग्या सो अन्तबै !
फुल्या सो कुमलाहीं !!
चिनीया सो ढही पेड् !
जो आया सो जाहीं !!
जीवाचे मैतर हा लेख "युवा सकाळ'मध्ये 5 ऑगस्ट 2005 मध्ये प्रसिद्ध झाला. या लेखाची कल्पना मला सुचली ती युवा सकाळमध्येच येत असलेल्या एका सदरावरुन. ते सदर नातेसंबंधावर होते. एकाद्या प्रसिद्ध आईविषयी तिचा मुलगा लिहायची. बापाविषयी मुलगी काहीतरी मांडायची. बहिणीविषयी भाऊ काहीतरी लिहायचा. वडिलांविषयी मुलगा, आजोबाविषयी नातू असे काहीतरी नातेसंबंधांचा चांगल्या अर्थाने उलगडा करणारे हे सदर होते. मला एकदा असा प्रश्न पडला की केवळ रक्ताच्या नात्यापलीकडे आपली काही नाती नसतात का? रक्ताच्या नात्यातील माणसंच आपले सगळे काही लागतात, असे काही आहे का? मग मला सुचले की आपण आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या माणसंविषयी लिहावे. मी युवा सकाळमध्ये त्यावेळी फोन केला. या सदरात लिहणारे जे होते ते मुंबईचे. म्हटले तसे जर काही ठरले असले तर उगाच आपण काहीतरी पाठवायचो आणि ते तसे पडून रहायचे त्यापेक्षा अगोदर विचारलेले बरे. त्यांनी मजकूर पाठवायला सांगितला. मी पाठवून दिला. महाराष्ट्रभर हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रीया कळविल्या. सोलापूर "सकाळ'मध्ये त्यावेळी पानांच्या मर्यादेमुळे स्वतंत्र आठ पाने प्रसिद्ध होत नव्हती मात्र पान आठला रंगीत पानावर खालचच्या बाजूला हा लेख मीच लावला. त्यावेळी निवासी संपादक अरुण खोरे होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी आवर्जून हा लेख चांगला झाल्याचे नुसते सांगितले नाही तर ती तीन माणसं कोण याचीही माहिती घेतली.
या लेखात त्या तिघांचीही नावे नव्हती. मला ते तिघे कुठे आहेत, सगळेच आहेत का नाहीत, याची एकतर कल्पना नव्हती. दुसरी बाब एकाद्याचे नाव आपल्या लेखात आपण वापरतो, त्याची त्याला कल्पना असायला हवी, असे काहीदा मला वाटायचे. दुसरे मुक्यामुक्याने लिहायची एक पद्धत असते. कुणाचातरी चांगला उल्लेख करुन पत्रकार म्हणून हा काही उकळत तर नाही ना, असे आपल्याला कुणी म्हणू नये याची एक धास्ती त्यावेळी माझ्या मनात असायची. त्याचा एक परिणाम कदाचित माझ्यावर झालेला असावा. त्यामुळे या लेखात त्या तिघांची नावे नव्हती, मात्र हा लेख काल्पनिक नक्कीच नव्हता.
लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी फोन केले. त्यात पुण्यातून सकाळ ऑफिसमधून श्रीधर लोणी आणि मुकुंद पोतरदार यांनी एकाचवेली लेख चांगला झाल्याचे कळविले. श्रीधरने त्यातल्या पहिल्या "कॅरेक्टर'ला ओळखले होते. त्याला नाव मात्र आठवत नव्हते. तो दोन वर्ष कोल्हापुरात होता. विद्यापीठात त्याने एमएस्सी केले. मी 91-92 मध्ये राजाराम कॉलेजला अकरावीत होतो. श्रीधर लोणीची पावती मला आजही खूप महत्वाची वाटते. कारण बहुतेक पत्रकार सहसा कधी एकमेकांच्या लेखाला चांगले म्हणत नाहीत. दुसरी बाब महाराष्ट्रात स्वतःच्या हिमतीवर, हुशारीवर, कामाने स्वतःचे पत्राकारीतेत नाव कमविणारी मला वाटतात अशी नावे मी मनात मानतो त्यात लोणीचा नंबर वरचा आहे, असे मला नेहमी वाटते. मी त्याच्या कष्ट करण्याच्या तयारीने अनेकदा दबून जातो. ओळखी तर त्याच्या प्रचंड आहेत. शिवाय वागण्याबोलण्यात कुठही कधीही कटूता नसते. पत्रकारितेसारख्या सडफडिंग व्यवसायात त्याने जपलेला शालीनपणा मला भारावून टाकतो. ही मी त्याची तारीफ करणे असा भाग नाही. एक वर्ष आम्ही बीसीजेला रानडे इन्स्टियुटमध्ये एकत्र होतो, मात्र तरी कधी माझा त्याच्याशी फार संबंध आला नाही किंवा घट्ट दोस्ती म्हणावे, असे काही घडले नाही. पण का कुणास ठाऊक हा माणूस मला नेहमी आवडत आला आहे. "सकाळ'मध्ये माझ्या आधी तो चार-पाच वर्ष लागला. माझ्या प्रशिक्षणाच्या काळात मला एनडीएमध्ये पासआऊट परेडचे कव्हरेज करण्याची असाईमेंट दिली होती. मी तो अनुभव घेऊन आलो. मात्र तिथले भाषण संपल्यावर ती बातमी पूर्ण करायला मला वेळ लागला. त्यावेळी श्रीधर इतकेच म्हणाला होता की "राजाराम गोष्टी झटपट शिकायला पाहिजे.' मला अजून वाटते की दुसरा कुणी एखादा असता तर त्याने उभे आडवे सोलून काढले असते.'
असो. पुन्हा मूळ विषयाकडे येतो.
""तो उंच मुलगा. पांढरी शुभ्र कपडे घालायचा. त्याच्यामागे सातारा जिल्ह्यातील पोरांचा ग्रुप असायचा. कोल्हापूर विद्यापीठाच्या हिरवळीवर तो बैठका घ्यायचा. राजाराम त्याचे काय नाव?'' श्रीधर लोणीने मला विचारले. त्याच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.
लेखात वर्णन आलेला पहिला माझा सिनीअर दत्ता केंजळे. सातारा जिल्यातील खटाव तालुक्यातील ललगुण हे त्याचे गाव. मी आतापर्यंत अनेक माणसं बघितली. कोल्हापुरातील दोन वर्षांच्या काळातही अनेक जणांशी ओळखी झाल्या, पण दत्ताजींच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर त्या काळात वेगळा प्रभाव पडला होता. पोरांचे नेतृत्व करणे, नवेनवे वाचन आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागाशी असलेली नाळ या गोष्टी मला मोहित करायच्या. मला ते फार भारी वाटायचे. झाले तर कलेक्टरच व्हायचे, असे ते म्हणायचे. त्यांनी इंजिनीअरिंग केले होते. बरोबरच्यांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. पण स्वतःच्या विचारांवर ते एकदम ठाम असायचे. मी तसा त्यांच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान तरीही काय मित्रा काय म्हणतोस, नव्या जुन्या अनेक गोष्टींची चौकशी करत रहायचे. काही गोष्टी समजून घ्यायचे काही नव्याने सांगायचे. ती दोन वर्ष झाल्यावर पुढे साधारण पाच वर्षांचा गॅप पडला. त्यांचा आणि माझा संपर्क होईल, असे काही घडले नाही. मी बारावीनंतर कोल्हापूर सोडले ते सोडले. नंतर मी एमए करीत असताना पुणे विद्यापीठात त्यांची माझी भेट झाली. ती काही क्षणापूर्ती. परंतु नंतरही पूर्णच संपर्क तुटला. त्यानंतर माझा हा लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतरही पाच-सहा वर्ष संपर्क नव्हता मात्र, त्यानंतरही या माणसाविषयीच्या ओढीतून मी त्यांना शोधायचा प्रयत्न केला. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जी क्रांती झाली त्याने ज्या अनेक गोष्टी साध्य झाल्या, त्यात माणसं एकमेकांना भेटणे निदान ती कुठे आहेत, याची तरी माहिती मिळू लागली. मी सोशल नेटवर्किंच्या "ऑरकुट' साईटवर दत्ता केंजळे हे नाव जाम धुंडाळले. त्या नावाचे चारपाच लोक यायचे. त्यांचे फोटो मात्र नव्हते. दोघांकडे मी तिथेच चौकशीही केली मात्र त्यांनी आम्ही ललगुणमधून आलेलो नाही, असे स्पष्ट केले. नंतर फेसबुकवरही त्यांना शोधले. पण मला काही ते सापडले नाहीत. मग त्यानंतर एक दिवस गुगलवर मी दत्ता केंजळे हे नाव "सर्च' केले. त्यातून त्यांचा मला मोबाईल नंबर मिळाला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्ट्टिुयुटमधून त्यांनी एमबीए केले आहे. तिथे मला माजी विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये त्यांचे नाव सापडले. त्यांचा मला मोबाईल नंबर मिळाला. मला काय आनंद झाला.
आता पुढचा प्रश्न होता, या माणसाशी आपण बोलायचे कसे? पत्रकारितेत अनेक मोठ्या लोकांशी संबंध येतो. विशेषतः पत्रकार परिषदांमध्ये तर कित्येकांना पत्रकार आडवे तिडवे करीत असतात. पण दत्ताजींना संपर्क करायचा म्हणजे माझ्यावर दडपण आल्यासारखे झाले. पहिली 90 ते 92 ही दोन वर्ष. त्यानंतर 98 ला झालेली धावती भेट. त्यानंतर थेट 2011 ला मी त्यांना फोन केला. राजाराम कानतोडे हे नाव सांगितले. ते म्हणाले, नुसते राजाराम नाही, राजाराम लक्ष्मण कानतोडे. केत्तूर. ता. करमाळा. होय ना? मी हो म्हणालो. ते म्हणाले मी एका बैठकीत आहे. त्यामुळे मी तुला फोन करतो. त्यानंतर त्यांनी संध्याकाली फोन केला. आमचे तुटके बोलणे झाले. पण मला लय भारी वाटले. आता ते कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्यात काय बदल झालेत मला माहित नाही मात्र आपल्याला जी माणसं आवडतात, आपल्यावर प्रभाव टाकतात, त्यांच्याशी संवाद हा आनंदाचाच भाग असतो.
आता किर्लोस्कर आहेत. मधल्या काळात ते सोलापूरला आले होते, पण माझी कामाची वेळ आणि त्यांची कामाची वेळ जुळली नाही. त्यामुळे आमची भेट काही झाली नाही.
लेखातला विकास म्हणजे विकास धस. सध्याचे सिनीअर पोलिस निरीक्षक. फौजदार होणे हेच त्याचे स्वप्न होते. त्यावेळी शरीरयष्टी फार भरभक्कम नव्हती. चष्मा असायचा. मला साधारण दोन वर्ष सिनीअर. त्याचे मूळ गाव अजूनही माहित नाही मात्र त्याचा एक भाऊ पोलिस खात्यातच अधिकारी होते. एक भाऊ पैलवानकी करीत होता. तो त्यावेळी स्पर्धा चांगल्याच गाजवित होता. विकासनेही फौजदार होण्यासाठी बरीच धडपड केली. ती बऱ्याच प्रयत्नानंतर फळाला आली. आपल्याला पोलिस खात्यातच जायचे, असे त्याचे ठरलेले होते. आपल्याला निदान हवालदार तर होता येईल, असे तो म्हणायचा. त्याचा स्वभाव प्रचंड धाडसी होता. त्यात अधूनमधून इतरांची टर उडविण्याचा एक रंग दिसायचा. त्याने काहीजण नाराज व्हायचे. पण एकाद्याच्या जीवाला जीव दिला की त्यासाठी कशाचीही पर्वा न करता सतत पुढे राहण्याची त्याची सवय होती. एकदा कोल्हापुरातच अकरावीला असताना आमच्याच वर्गातल्या हुपरीच्या एका पोराने मला दमदाटी केली. ही गोष्ट तो ऐकत होता. त्याने त्या पोराला इतकेच सांगितले. "आता तू जा. एकटा आहेस, उद्या येताना मात्र तुझी कोण पोर आणणार आहेस ती घेऊन ये. बघतो तुला कॉलेजवर.' त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पोराची कॉलेजवर पोरांच्या गर्दीत त्याने जोरदारच धुलाई केली. मी काय करीत असेल? त्यांची भांडण सोडवित होतो. माझ्यामुळे तो त्याला धुत होता आणि मी माझ्याच बाजूने उभा नव्हतो. मला आजही या गोष्टीची मोठी गंमत वाटते. आपण इतके असे कसे असा प्रश्न पडतो. त्यानंतर विकासची आणि माझी भेट पुणे विद्यापीठातच 1999 च्या आगेमागी कधीतरी झाली. तो स्पर्धा परीक्षेसाठी झगडत होता. त्यावेळी त्याने मला माहिती दिली राजाराम तुमच्यासाठी आपण ज्या पोराशी भांडण केली त्याची पुढे काही माहिती आहे का तुम्हाला? सहाजिक मला माहित असणे शक्य नव्हते. त्याने सांगितले, खून प्रकरणात तो तुरुंगाची हवा खात आहे. मी चाटच पडलो. नंतरही आमची काही भेट झाली नाही. मात्र कुणाकडूनतरी कळले, तो फौजदार झाला. मला फार आनंद झाला पण संपर्काचे कुठलेही साधन नव्हते. रोजच्या धबडग्यात त्यासाठी प्रयत्न करणेही शक्य नव्हते. मात्र त्याच्यावर 2012 मध्ये "लोकमत'मध्ये लेख आला. माणसं वाचाविण्यासाठी कऱ्हाडला असताना बिबट्यावर त्याने गोळीबार केला. हे प्रकरण बरेच गाजले. त्यानंतर प्रशांत शेडेंकडून मला त्याचा नंबर मिळाला. मी त्याला फोन केला. मला फार बरे वाटले.
लेखात उल्लेखलेला तिसरा त्या काळातला मित्र म्हणजे विश्वास नांगरे पाटील. त्यांच्याविषयी मी काय लिहावे. सगळ्या महाराष्ट्राला त्याची कारकिर्द माहित आहे. जळगावात असताना त्याने सेक्स कॅंडल, लातूरात असताना चंदनाचा कारखाना, पुण्यात असताना रेव्ह पार्टी, मुंबईत दहशतवादी हल्ला या प्रकरणांमध्ये विघातक प्रवृत्ती ठेचण्यासाठी ते सतत "फ्रंट'ला असल्याचे सगळ्यांना माहित आहे. मीही त्याच्या बातम्या वाचल्या आहेत. यापेक्षा अजून त्यांच्याविषयी खूप काही लिहता येईल. आता तर अनेकदा वृत्तवाहिन्यांवर विविध चर्चांमध्ये ज्या दमदारपणे ते सहभागी होतात, त्यांचा खच्चून भरलेला कॉन्फिडन्स मी बघतो त्यावेळी लक्षात येते, या माणसाने स्वतःचा कॉलेजमध्ये असलेला चार्म उतरुच दिलेला नाही. मी त्यांना 1998 नंतर कधीच भेटलो नाही. मला त्यांना भेटावे, अशी जरुरीही वाटली नाही. अशा मोट्या पदांवरच्या माणसांना जवळीक घेऊन भेटायचे म्हणजे माझ्या मनावर एक दडपण येते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, राजकारणी किंवा मोट्या पदांवरल्या व्यक्तीपासून मी सतत दूर पळतो. दुसरे त्यातले काही नग जवळीक करतात पण तात्पुरती. याची वर्तमानपत्राची उर्जा संपली की सगळीकडे हडहड होते. त्यामुळे आपण भले, आपली माणसं भली असे मला वाटते. त्यामुळे मी प्रसिद्धीत असलेल्या माणसांपासून सतत दूर राहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट अशी मोठ्या पदांवरील माणसं सतत व्यस्त असतात. आपण त्यांना उगाचच व्यत्यय करणे मला कधी पटत नाही.
या तिघांविषयी मला फार आपुलकी वाटण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात ती गावाच्या मातीतून आलेली असणे हा एक भाग आहे. दुसरी बाब ही तिघेही माणसं आपपल्या पद्धतीने समाजासाठी चांगले काहीतरी योगदान देतायत ही माझी धारणा आहे. तिसरी बाब त्यांची कॉलेज जीवनात जी हुंबाडी होती ती तशीच आहे. नाहीतर अनेकदा पोर कॉलेज संपले की जगण्याच्या लढाईत चोळामोळा होऊन जातात. आपल्याला काय करायचेय ते विसरुनच जातात. त्यामुळे कॉलजेमध्ये मला जी माणसं भारी वाटली ती पुढे तशीच राहिली, हि गोष्ट त्यातली माझी मला भावते.
-----------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा